ब्रॅण्डचे नाव : वरद इंडस्ट्रीज
ब्रॅण्डची स्थापना : २०१७
‘वरद’ हे गणपतीचे नाव आहे आणि वास्तूनुसार ‘व’वरून ठेवायचे होते म्हणून ‘वरद इंडस्ट्रीज’ हे नाव ठेवले. हा ब्रॅण्ड 2 wheelers च्या rubber components Manufacturing चा आहे. आमच्याकडे टू व्हीलर सेक्टरमध्ये रबर पार्टस बनवणारी एक्स्पर्ट टीम आहे. ऑर्डरनुसार आम्ही वेगवेगळे पार्टस बनवतो.
रेल्वे, शेती, ऑटोमोबाईल व आर्मीमध्ये लागणारे रबर पार्ट्स develop करून देतो. कामात आणि प्रॉडक्ट्समध्ये उत्तम गुणवत्ता ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.
कंपनीचे मालक : विजय पिंजारी
विजयहा शेतकरी कुटुंबातील मुलगा असून २०१४ साली BE mechanical करून ३ वर्ष नोकरी केली. छोट्या छोट्या कंपन्यांत काम केले. त्यामुळे सर्व शिकता आले. या अनुभवातून २०१७ साली त्यांनी स्वत:चं स्टार्टअप केलं. सुरुवातीची २ वर्ष खराब गेली. त्यानंतर आता जम बसला.