ब्रॅण्डचे नाव : Super Kids Forum
ब्रॅण्डची स्थापना : २०२०
ब्रॅण्ड कशाचा आहे?
इयत्ता पाचवी ते दहावीच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बनवला गेलेला ऑनलाइन प्रोग्राम
हा प्रोग्राम जॉइन केलेल्या मुलांच्या म्हणजेच आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्व क्षमता एका सामान्य मुलापेक्षा सुपर असतात. जसे की ते स्वतःच्या गोष्टी स्वतः करण्यास सक्षम असतात. कोणतेही काम किंवा अभ्यास Smartly कसा करावा याच ज्ञान त्यांना दिलं जात. आमचे विद्यार्थी एकूणच आदर्श जीवन जगतात.
Super Kids Forum एक असं माध्यम जे मुलांमधील पॉवर अर्थात त्यांची शक्ती ओळखून त्याला सुपर पॉवर बनवायला मदत करेल. म्हणजेच मुलांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होईल.
Super Kids Forum हा प्रोग्राम पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी डिझाइन केला आहे. हा देशातील पहिला असा प्रोग्राम आहे, जिथे मुलांना आपली संपूर्ण जीवनपद्धती कशी असावी इथपासून ते त्यांच्या आवडीनिवडी ओळखून त्याच क्षेत्रात पूर्णपणे शेवटपर्यंत योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्यात येतं.
यात विशेषतः योग, आरोग्य, सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान Aptitude and Reasoning Test, Mental Ability Test, Computer and IT courses हे विषय घेतले जातात.
या प्रोग्रॅमचे वैशिष्टय म्हणजे गेली ३० वर्षातील विविध क्षेत्रांतील घडामोडींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन आणि त्यांचा अभ्यास करून त्या त्या क्षेत्रातील एक्स्पर्ट्सकडून मार्गदर्शन घेऊन हा प्रोग्राम अशाप्रकारे डेव्हलप केलेला आहे की मुलांच्या भविष्यात येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आज मुलांना काय शिकवणे गरजेचे आहे ते सर्व विषय एकत्र मिळून Super Kids Forum प्रोग्राम आहे.
टेस्टमधून मुलांचं मूल्यांकन केलं जाईल व त्याचा प्रत्यक्ष निकाल पालकांना दाखवला जाईल. ज्यातून पालकांनासुद्धा मुलांची वाढ लक्षात येईल. कार्यक्रमाचा शिकवण्याचा दृष्टिकोन : हँड्स-ऑन, परस्परसंवादी, प्रकल्प-आधारित या तीनही दृष्टिकोणांच्या आधारे हा प्रोग्राम चालवला जातो.
काही महत्त्वाची हँडबूकस जी आम्ही खासकरून Super Kids Forum प्रोग्राममधील मुलांसाठी लिहून ठेवलेली आहेत.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा मागोवा घेतला जातो आणि पालकांना कळवले जाते.
प्रत्येक सेशनला पालकसुद्धा मुलांसोबत जॉइन होऊ शकतात व पालकांना वेळोवेळी मुलांची प्रगती कळवली जाईल.
विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य किंवा कर्तृत्व प्रदर्शित करण्यासाठी संधी आहेत.
कंपनीचे नाव : The Career Connection
कंपनीचे भागीदार : नितीन बांदेकर आणि सौरभ खानविलकर

नितीन बांदेकर :
- एक महान राष्ट्रनिर्माण करण्यासाठी शिक्षण आणि अनोखे उपक्रम तयार करण्याचा २७ वर्षांचा अनुभव.
- SGGS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नांदेड, महाराष्ट्र १९९४ मध्ये विशेष प्राविण्यासह पदवी प्राप्त केली.
- १९९६ मध्ये पुण्यात पहिली IT इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सुरू केली.
- २०१४ मध्ये विद्यार्थ्यांसाठी करिअर कनेक्शन, प्रशिक्षण आणि प्लेसमेंट उपक्रम सुरू केले, ज्याद्वारे २५ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांना पुणेस्थित कंपन्यांमध्ये नियुक्त केले गेले.
- बांदेकर यांनी “टेक-फोरम” या नावाने ओळखले जाणारे सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म यशस्वीरित्या विकसित केले आहे जे सहजपणे योग्यता, आत्मविश्वास, संवाद कौशल्ये, विद्यार्थ्याची सादरीकरण क्षमता यासारखी सॉफ्ट स्किल्स विकसित करते.
- नितीन बांदेकर यांची अलीकडेच पश्चिम भारतासाठी STEM (विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी गणित) अंमलबजावणी चॅनेल भागीदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ज्याद्वारे त्यांची महाराष्ट्र आणि गोवा प्रदेशात विज्ञान प्रयोगशाळा आणि तंत्रज्ञान इंटर्नशिप लॅब्स स्थापन करण्याची योजना आहे. आता सर्व IT आणि ITES संस्थांमध्ये STEM प्रमाणित अभियंत्यांची भरती करण्याचा ट्रेंड आहे.
- आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली आणि मनशक्ती रिसर्च सेंटर लोणावळा यासारख्या विविध आध्यात्मिक संस्थांचे खरे अनुयायी. त्यांनी महाराष्ट्रातील काही महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स समित्यांचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.

सौरभ खानविलकर
- भारतीय स्काउटमध्ये राज्य पुरस्कार आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त
- सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली या नामांकित शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण
- SKSV कॉलेज, लांजा, रत्नागिरी येथे B.Sc. गणितात स्पेशलायझेशन घेऊन पदवी प्राप्त केली
- पुण्यात कंटेंट क्रिएटर आणि व्हिडीओ एडिटर म्हणून काम केले आहे जिथे ब्रीदवाक्य आहे “सामग्री विश्वास निर्माण करते, ट्रस्ट ब्रँड बनवते, ब्रँड खरेदी करते” (“Content builds trust, trust builds brands, brands buy”.)
- स्वतःचे YouTube चॅनल ‘आयुष्यावर बोलू कही with…सौरभ’
- सोशल मीडिया व्यवस्थापन
- नितीन बांदेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली “सुपर किड्स फोरम” हा मुलांचा सर्वांगीण विकास घडवणारा (ऑनलाइन व ऑफलाइन) प्रोग्राम बनवण्यात मोलाचा वाटा.