ब्रॅण्डचे नाव : Shreeodanam Foods Industry
ब्रॅण्डची स्थापना : १५ डिसेंबर २०१९
ब्रॅण्ड कशाचा आहे? : मसाले अँड Premixes
‘श्रीओदनम’ हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ आहे नैवेद्य. भारतीय मसाले हे पारंपारिक आहेत. अन्नाला नैवेद्याचा सात्विकपणा प्रदान करणारा मसाला म्हणजेच श्रीओदनम मसाले. मसाले हे अन्नाची चव वाढवण्यासाठी वापरले जातात. त्याचबरोबर मसाल्याचा औषधी गुणांमुळे आपले आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते.
बाजारातून उत्तम दर्जाचे खडे मसाले स्वतः खरेदी करतो. स्वच्छतेची सर्व काळजी घेऊन आईच्या मायेने सर्व प्रकारचे मसाले तयार केले जातात. उत्तम दर्जा, उत्कृष्ट स्वाद आणि घरपोच डिलिव्हरी यामुळे श्री ओदनम मसाले अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरले. हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स, रिसेलर्स यांना वाजवी किमतीमध्ये मसाले उपलब्ध होतात. सर्व मसाले ऑर्डर प्रमाणे ताजे तयार केले जातात.
‘श्रीओदनम’ची प्रॉडक्ट्स
- काळा मसाला
- गोडा मसाला
- कांदा लसूण मसाला
- गरम मसाला
- किचन किंग मसाला
- चिकन मसाला
- फिश मसाला
- सांबर मसाला
- छोले मसाला
- पाव भाजी मसाला
- मिसळ मसाला
- चहा मसाला
- सँडविच मसाला
- बिर्याणी मसाला
Premixes
- सांबर प्रिमिक्स
- मिसळ प्रिमिक्स
- उपीट प्रिमिक्स
- शिरा प्रिमिक्स
कंपनीच्या संस्थापक : सीमा पांडुरंग गुळवे
‘श्रीओदनम’ मसालेच्या फाउंडर डायरेक्टर सीमा गुळवे या मूळच्या मराठवाड्यातील बीडच्या. एमसीएपर्यंत शिक्षण झाले. लग्नानंतर पुणे येथे स्थायिक झाल्या. कंप्यूटर इन्स्टिट्यूटमध्ये हेड म्हणून काही वर्षे जॉब केला. डिसेंबर २०१९ मध्ये मसाला व्यवसायाची सुरुवात केली.
करोना काळात नियमाचे पालन करत घरपोच मसाले दिले. सीमा गुळवे यांना ‘आपला आवाज’, ‘आपली सखी’कडून उद्योजिका पुरस्कार मिळाला आहे, तसेच पुढारी न्युजकडून नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संपर्क : 7030895346