अन्नप्रक्रिया व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मशीन बनवणारे ‘श्री यंत्र’ मशिनरी

ब्रॅण्डचे नाव : श्री यंत्र मशिनरी

ब्रॅण्डची स्थापना : २०१७

‘श्री यंत्र’ मशिनरी मॅन्युफॅक्चररकडून गृहोद्योगासाठी व विविध अन्नपदार्थप्रक्रियेसाठी आवश्यक पापड मशीन, शेवई मशीन, कांडप मशीन, पिठाची चक्की, रवा चाळण, तेलाचा घाणा, पल्वलायझर, घरघंटी, कुरडई मशीन, विविध प्रकारचे मिक्सर यासारखी मशीनरीज रेडीमेड तसेच गरजेनुसार तयार करून मिळतात व महत्त्वाचे म्हणजे विक्रीपश्चात आवश्यक ते मार्गदर्शन व सेवा दिली जाते.

एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये बालपणापासूनच घरात पिठाची चक्की व इतर अन्नपदार्थप्रक्रियेसाठी आम्हीदेखील रेडीमेड मशीन विकत घेत होतो, परंतु त्या वापरत असताना अनेक समस्या येत होत्या. रेडिमेड घेतलेल्या मशीन हवे तसे भक्कम मिळेनात व इतके सारे पैसे मोजुनसुद्धा समाधानकारक आऊटपुट मिळत नसल्याने आम्ही त्यात आम्हाला हवे तसे बदल करायला सुरुवात केली.

त्या सर्व प्रयत्नांत आम्हाला यश मिळत गेले. त्यातूनच आम्ही स्वत:साठीच मशीन तयार करण्यात यशस्वी ठरल्यानंतर आज मितीस महाराष्ट्रासह इतर राज्यातही आमचे शेकडो ग्राहस समाधानाने व्यवसायाच यशस्वी ठरत आहे.

कुठल्याही शुभकार्याचा आरंभ श्री गणेशाच्या नावाने केला जातो म्हणूनच आमच्या कंपनीचे नाव ‘श्री यंत्र’ ठेवले. तुलनात्मकदृष्ट्या रास्त किमतीत दर्जेदार व अद्ययावत मशीनरी, विक्रीपूर्व मशीन हाताळायचे मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक व विक्रीपश्चातदेखील तात्काळ सेवा दिल्या जातात.

हजारो सुशिक्षित तरुण सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून बेरोजगार असल्याचे निदर्शनास येते. मिळालीच कुठे खासगी नोकरी तर तटपुंज्या पगारावर घरसंसार चालवणे कठीण असते. अशा परिस्थीतीत हतबल न होता, काहीतरी करून दाखवण्याची इच्छाशक्ती असलेले तरुण स्वत: उद्योजक होऊन पापड मशीन, शेवई मशीन, मिरची कांडप मशीन, तेलाचा घाणा, कुरडई मशीन, पिठाची चक्की व तत्सम प्रकारची अन्य काही मशीनरीज खरेदी करून स्वत:चा अन्नप्रक्रिया उद्योग उभा करू शकतात.

जनार्दन पद्माकर पैठणे

या माध्यमातुन चांगले उत्पन्न मिळवु शकतात. म्हणुन असे उद्योजक घडवण्यासाठी त्यांना आपणच अगदी रास्त किमतीत दर्जेदार मशीनरी उपलब्ध करून द्यावी असा निश्चय केला. त्यानुसार मशीनरीचे उत्पादन सुरू झाले. सदर मशिनरी तयार करताना लागणारे साहित्य किंवा उपकरणं ही अतिशय दर्जेदार वापरली जातात.

गुणवत्तेत कुठलीही तडजोड न करता अगदी रास्त किमतीत सदर मशीनरी उपलब्ध करून दिली जाते. तसेच व्यवसायाला लागणारे भांडवलउभारणीसाठी शासनाच्या विविध योजनांविषयीदेखील मार्गदर्शन केले जाते.

महत्त्वाचे म्हणजे मशीन हाताळायचे प्रात्यक्षिक देऊन वेळोवेळी आवश्यक ते मार्गदर्शन केले जाते तसेच विक्रीपश्चात गरज लागेल तेव्हा सेवादेखील दिली जाते. अशा या व्यवसायात अतिशय कमी वेळेत चांगला प्रतिसाद मिळत असून या पुढेही हजारो उद्योजक या माध्यमातुन घडवण्याचा जनार्दन पैठणे यांचा मानस आहे.

कंपनीचे मालक  : जनार्दन पद्माकर पैठणे
मु.पो. वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक

संपर्क : 9422772659 / 8421100027

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Scroll to Top