ब्रॅण्डचे नाव : निवा
ब्रॅण्डची स्थापना : २०१२
अर्जुन पाटील व निवेदिता पाटील कंपनीचे दोन डायरेक्टर्स असून दोघेही मायक्रोबायोलॉजीमधून एम.एसस्सी झाले आहेत. दोघांनाही औषधनिर्मिती कंपनीत नोकरीचा अनुभव आहे.
लग्नानंतर काही दिवसातच निवेदिता हिला अर्धांग वायूचा झटका आला. त्यानंतर त्या दोघांनी शहरात न राहता आपल्या मूळ गावी येऊन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आजारपण जे त्यांचं weak पॉईंट बनलं होतं, त्यालाच त्या दोघांनी strong पॉईंट बनवलं.
निवेदिता यांच्या नावातून ‘निवा’ असे ब्रँडचं नाव तयार करून २०१२ ‘NIVA Hydraulics’ या नावाने पहिल्या व्यवसायला सुरुवात केली. यामध्ये सर्व hydraulic hoses चे assembly manufacturing ची सुरुवात केली. या hoses चा वापर हा jcb, pokland, boring मशीन, mechanical, automobile इत्यादी ठिकाणी होतो.

‘निवा’ ग्रामीण भागात काम करत असून ग्रामीण युवकांसाठी रोजगारनिर्मिती करत आहे. अनेक ब्रॅन्डेड कंपन्याचे विविध हॅड्राॅलिक मशीन्स कोट्यावधी रुपये खर्च करून खरेदी केले जातात, पण छोट्याशा होजेसमुळे कंपनीकडून होजेस उपलब्ध होईपर्यत बंद ठेवावी लागते. ही गरज ओळखून सदरहु मशीनला लागणारे सर्व प्रकारचे होजेस बनवून देण्यासाठी अगदी अद्यावत मशीन शाॅप उभे केले. रिइंजिनिअरींग करून उच्च दर्जाचे होजेस व्यवसायिकास त्वरित उपलब्ध करून देत आहोत.
सन २०१६ मध्ये Niva Industries ते Niva Industries Pvt Ltd झाली असून JSW, ह्या नावाजलेल्या बॅंन्डेचे विविध इलेक्ट्रिकल्स उत्पादनांचे अद्यावत दालन, पेंन्ट शाॅप, हायजिन प्राॅडक्टस् इत्यादी व्यवसायिक शाखा असून हायजिन प्राॅडक्ट्सनी सर्व जबाबदारी निवेदिता संभाळत आहे. सांगली जिल्ह्यातील वास्तुनिर्मीती करणाऱ्यांना एक छताखाली सर्व वस्तू उपलब्ध करून देण्यास कंपनी वाटचाल चालू आहे.
अद्यावत होजेस निर्मीती शाॅप उपलब्ध झाल्यामुळे आता कंपनी देशभरातील अनेक कंपन्यांचे व्हेंडरशिपसाठी प्रयत्न करत आहे. नॅशनल स्माॅल इंडस्ट्रीज कार्पैरेशन या केद्र शासनच्या पंचतांराकिंत कंपनीकडे नोंदणी करत असुन देशभरातील सरकारी कंपनीनां लागेल विविध प्रकारचे होजेस पुरवठा करण्याचा प्रयत्न चालू आहेत.
अर्जुन पाटील हे लघुउद्योग भारती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर मुंबई, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर अशा विविध औद्योगिक संघटनांचे सदस्य असून नुकतेच रोजगारनिर्मिती व कौशल्य विकास मंत्रालय, महाराष्ट्र शासन यांनी कवठे महांकाळ आयटीआयवर इंडस्ट्री प्रतिनिधी म्हणून त्यांची नेमणूक केली आहे.
कंपनी डायरेक्टर्स : अर्जुन पाटील व निवेदिता पाटील
संपर्क : ९७६६९३०११७