या प्रगतिशील मत्स्य व्यावसायिक दाम्पत्याने सुरू केला आगळावेगळा स्टार्टअप

मी सुनील रमेश अक्रेकर. जेवढी मोठी स्वप्ने असतात, तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात, यशसुद्धा तेवढंच मोठं मिळतं.

‘कोळीवाडा डॉट कॉम’ या नावाने मी समुद्रातील ताज्या मास्यांचा व्यवसाय सुरू केला व त्यानंतर २०२१ साली ‘फ्रेश ट्रॅडिशनल फिश प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची स्थापना केली. स्वतः मच्छिमार कोळी असल्यामुळे आपल्या समाजासाठी तसेच आपल्या व्यवसायाविषयी काहीतरी आगळेवेगळं करायचं हे सुरुवातीपासूनच ठरवलं होतं.

समुद्रातील ताजा मास्यांचा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने अनेक कोळी बांधव करीत आहेत, परंतु या व्यवसायामध्ये अजून बराच नावीन्यपूर्ण गोष्टींची आवश्यकता होती. काळानुसार बदल होणं गरजेचं होतं व याचा नुसता विचार करून चालणार नव्हतं तर ठोस पाऊल उचलणं गरजेचं होतं, मास्यांपासून वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ तयार होऊ शकतात का? व ते टिकू शकतात का?

सुरुवातीला अनेक समस्या होत्या, व्यवसायाचे प्रशिक्षण, संभाषण चातुर्य, फूड प्रोसेसिंगचे ट्रेनिंग, मास्यांच्या माहितीसाठी बस-ट्रेनचा प्रवास, भारतातील विविध मच्छिमार बंदरांना भेटी देणे, त्यांची माहिती घेणे, मास्यांमधील औषधी गुणधर्म यांची माहिती घेणे, अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळवणे, वेगवेगळ्या प्रोसेसिंग प्रोजेक्ट व छोट्या मोठ्या उद्योगांना भेटी देणे.

या दरम्यान पोरबंदर वेरावलपासून केरळपर्यंत ते हावडा कलकत्ता इथपर्यंत सर्व मच्छीमार बंदरांना भेटी देणे व इथूनच माझ्या व्यवसायाला सुरुवात झाली. मासे व त्याचे मूल्यवर्धित पदार्थ सुके मास्यांची व ओल्या मास्यांची यांचे वेगवेगळे पदार्थ तयार करणे व ते टिकवणे, त्यासाठी लागणाऱ्या मशिनरींची, यंत्रसामुग्रीची जमवाजमव करणे, माणसांना पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देणे, इथून व्यवसायला सुरुवात झाली.

समुद्रातील मास्यांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. प्रत्येक मास्यांची स्वतःची अशी वेगळी चव आहे. त्यांचे रंग आकार व गुणधर्म वेगवेगळे आहेत. भारतामधील समुद्रातील ताज्या मास्यांना परदेशामध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे, कारण आपल्या येथील मास्यांचा दर्जा अतिशय उत्कृष्ट आहे.

भारतातील सुके मासे मोठ्या प्रमाणात परदेशामध्ये निर्यात केले जातात व त्यांचेही अनेक मूल्यवर्धित पदार्थ तयार होतात. भारतातून पापलेट, कोलंबी, बांगडा, सुरमई, घोळ, दादा माकुल, बोंबील, रावस, पाला, शिवण खेकडे असे अनेक प्रकारचे मासे परदेशामध्ये निर्यात करून पाठवले जातात, परंतु मच्छीमारांकडून पकडलेल्या माशांपैकी जवळ जवळ २० टक्के मासे हे कोणतेही प्रोसेसिंग न केल्यामुळे खराब होतात. यामुळे मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

इतक्या मोठ्या प्रमाणात मत्स्यसंपदा असताना या व्यवसायामध्ये व मूल्यवर्धित पदार्थ बनवण्याच्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगसंधी दडलेली आहे याचा आपण काय फायदा घेऊ शकतो या विचाराने मी माझ्या स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली.

गेली दहा-बारा वर्षे मी या व्यवसायाशी संलग्न आहे. मास्यांपासून फिश वडे, फिश पॅटिस, फिश कबाब, फिश फिंगर, फिश टिक्का, फिश बर्गर पॅटी, मास्यांचे लोणचे, मास्यांचे पापड, मास्यांपासून समोसे, मास्यांचे स्प्रिंग रोल तसेच सुक्या मच्छीपासून चिवडा, मसाला चिवडा,असे जवळजवळ १२० ते १३० प्रॉडक्ट आमची कंपनी तयार करते.

प्रत्येक मास्यांची वेगवेगळी चव आहे, मत्स्यखवय्यांची गरज लक्षात घेऊन व इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी असलेला व्यवसाय लक्षात घेऊन सुरमईचे वडे, पॅटीस, रोल, कोलंबीचे कटलेट पॅटीस कबाब लॉलीपॉप, कुपा (टूना) फिश यापासून कबाब वडे, खिमा रोल, भरलेला पापलेट, भरलेला हलवा, भरलेला बांगडा, भरलेली सुरमई, भरलेला माकुल असे विविध पदार्थ तयार होऊ शकले, कारण प्रत्येक माशाची चव व गुणधर्म हे वेगवेगळ्या आहेत.

गेली दहा-पंधरा वर्षे या व्यवसायामध्ये मी आहे अनेक अडचणींना सामोरे जाऊन आज इथपर्यंत पोहोचलो आहे, यश- अपयश अगदी जवळून बघितले आहे, घरातील आई, भाऊ, माझी बायको व काही निवडक मित्रांच्या सहकार्यामुळेच मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे.

समाजामधून बरेच घेण्यासारखे आहे व शिकण्यासारखे आहे. या समाजाने मला फार काही शिकवले आहे, व्यवसायिकांना धर्म, जात, यश, अपयश, अपमान किंवा प्रसिद्धी मीपणा बऱ्याच गोष्टी हा समाज आपल्याला शिकवत असतो.

आपण आपल्या समाजाचे, आपल्या देशाचे देणे लागतो. व्यवसायात येणाऱ्या अनेक अडचणी जवळून बघितल्या आहेत त्यामुळे इतर नवउद्योजक तसेच व्यावसायिकांना त्या अडचणीपासून कशाप्रकारे आपण मदत करू शकतो, यासाठी काही प्रयत्न आम्ही करीत आहोत.

पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिला नाविन्यपूर्ण ‘फिश क्लस्टर’ ही योजना उद्योग विभागामार्फत राबवीत आहोत व यामुळे जवळजवळ हजार ते पंधराशे बेरोजगार तरुणांना रोजगार संधी उपलब्ध होत आहे व १०० ते २०० नवउद्योजकांना व्यवसायसंधी उपलब्ध होत आहे.

हे सर्व माननीय प्रिन्सिपल सेक्रेटरी हर्षदीप कांबळे सर तसेच जॉईन डायरेक्टर सुरेश लोंढे सर व पालघर जिल्ह्याच्या जनरल मॅनेजर वृषाली सोनी मॅडम, तसेच जयेश अक्रे व प्रशांत देव यांच्या प्रयत्नामुळे हे आमचे मोठे स्वप्न पूर्ण होत आहे.

माझा अनेक वर्षाचा अनुभव, घेतलेली प्रचंड मेहनत, माझ्या अनेक गुरूंचे योग्य मार्गदर्शन तसेच भारत सरकार व महाराष्ट्र राज्य यांच्या विविध योजना माझ्या अनेक मित्रांचे प्रयत्न यामुळे एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे व त्यातूनच मी डायरेक्टर सुनील रमेशअक्रेकर व शीतल सुनील अक्रेकर आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने हा व्यवसाय पुढील वर्षभरात करोडो रुपयांचे आर्थिक उलाढाल करण्याचे स्वप्न पाहत आहोत.

फ्रेश ट्रॅडिशनल फिश प्रायव्हेट लिमिटेड लवकरच संपूर्ण भारतभर आपला व्यवसायाचा विस्तार करीत आहे. आम्ही दहा लाख रुपये व पाच लाख रुपये तसेच ग्रामीण भागासाठी फक्त दोन लाख ५० हजारमध्ये फ्रेंचाईजी मोडेल चालू केले आहोत.

या फ्रॅंचायजी मॉडेलमध्ये व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू आम्ही पुरवीत असून त्यांचे कोणतेही वेगळे शुल्क आकारत नाही. त्याचप्रमाणे व्यवसायासाठी लागणारे सॉफ्टवेअर, मार्केटिंगची मदत, ट्रान्सपोर्ट सुविधा, व्यवसायासाठी लागणारे बोर्ड, बॅनर व इतर बहुतेक गोष्टी आम्ही पुरवतो.

आमच्या फ्रेंडली मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे या दुकानात समुद्रातील ३० प्रकारचे ताजे मासे, सुकवलेले मासे, व्याक्युम पॅकिंग व नायट्रोजन पाऊच पॅकिंग तसेच मास्यांचे वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ, मसाले तसेच व्हेज व गावठी अंडी, चिकनचे नॉनव्हेज प्रॉडक्ट उपलब्ध असणार आहेत.

मत्स्य खवय्यांसाठी तसेच ग्राहकांचा विचार करून व नवीन उद्योजकांचा विचार करून वरील सर्व बाबींचा विचार करून आम्ही वरील फ्रॅंचाईजी मॉडेल तयार केलेले आहे. सुरुवातीला मुंबई ,पुणे, नाशिक व नंतर महाराष्ट्रामध्ये व लवकरच भारतामध्ये आपले फ्रेंचायसी नेटवर्क चालू करावयाची उद्दिष्ट ठेवलेले आहे.

Fresh Traditional Fish Private Limited

Supply of Fresh Raw Fish and Manufactures of Top Quality Fish Processing Frozen Sea Food

Fssai License Number: 11523023000250

GST Number: 27AAECF0085F1ZU

Website: www.freshtraditionalfish.com

YouTube: Video 1 | Video 2

Office Address : House No. 1074, Murbe, Palghar Maharashtra 401501

Email: sunilakrekar@gmail.com

Mob. 9309909659 / 8698039011

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Scroll to Top