२७ वर्ष नोकरी केल्यानंतर सुरू केला स्वतःचा इपोमॅक्स® हा ब्रँड

ब्रँडचे नाव : इपोमॅक्स®

ब्रँडची / व्यवसायाची स्थापना : २०१९-२०२०

मी संजय प्रभाकर सोनवणे, राहणार, पुणे, माझा जन्म पुणे येथे झाला, माझे शिक्षण B.COM, MCM, MBA झाले असल्यामुळे मी एका नावाजलेल्या अशा लिस्टेड आणि ब्लू चीप कंपनीमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीपासून ते डेप्युटी मॅनेजर या पदापर्यंत २७ वर्ष नोकरी केली आहे. इतकी वर्ष नोकरी केल्यानंतर मिळणारा मोबदला आणि २७ वर्ष केलेले काम यांचा रेशो फार कमी व शुल्लक होता.

आजच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढलेले आहे. नोकरी मिळणे कठीण झालेले आहे आणि मिळाली तर कमी पगार आणि ती टिकवणे हे पण कठीण झालेले आहे म्हणून आता पुढील पिढीच्या भविष्यासाठी मी स्वतःचा उत्पादन व्यवसाय सुरू केला पाहिजे, असा विचार फार वर्षापासून माझ्या मनात घोळत होता.

काय बिझनेस करावा? हा एक प्रश्न समोर होता व तसेच जवळ पैसा ही मुबलक नव्हता. चालू नोकरी सोडून भविष्य निर्वाह निधीच्यामार्फत आणि बँकेतून कर्ज काढून भांडवल उभे करावे, असा एकच मार्ग मला दिसत होता आणि तोच विचार सारखा माझ्या मनात येत होता.

कंपनीचे कार्य करताना चांगले व्यवस्थापन, कधी कडक, तर कधी नरम असे नियंत्रण, योग्य व कौतुकास्पद आयोजन, प्रशासन, इतर संसाधनांची कार्यक्षम संघटना, संघटनात्मक उद्दिष्टे, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देश, समन्वय, मासिक अहवाल ,आर्थिक बजेट, माल विक्री, माल खरेदी, विक्रेता, उत्पादन किंमत, उत्पादन खर्च, या सगळ्या कामाचा अनुभव दांडगा मिळाला होता.

नोकरी करताना कंपनीसाठी पूर्णपणे स्वतःला झोकून ज्या एकाग्र चित्तेने दिवस-रात्र काम केले जर तितकेच काम, बुद्धीचा वापर आणि वेळ जर आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी दिले तर नोकरीपेक्षा आपली अधिक प्रगती होईल असे जाणवू लागले आणि नवीन काही तरी करायचे हे विचारचक्र डोक्यात चालू झाले व त्याच बरोबर अभ्यास आणि योग्य नियोजनाला सुरुवात झाली.

अलीकडच्या काळात पुणे येथे इलेक्ट्रॉनिक, ऑटोमोटिव, यांत्रिक, बॅटरी उद्योग, आय टी, रोबोटिक्स, रिन्युयेबल एनर्जी, बिल्डिंग निर्माण, अनुसंधान एवं विकास, प्लास्टिक उद्योग, पेंट, केमिकल, आर्ट आणि क्राफ्ट, कला व शिल्पकला अशा निरनिराळ्या क्षेत्रात फार मोठी औद्योगिक प्रगती झाली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, भोसरी, चाकण, तळेगाव, रांजणगाव, खेडशिवापूर, नऱ्हे, हिंजेवाडी, सणसवाडी, अशा विविध ठिकाणी अनेक नवीन इंडस्ट्रीज निर्माण होत असल्यामुळे भविष्यात खूप मोठा व्यवसाय मिळू शकतो हे मी जाणले होते.

आज पुणे शहर हे आज औद्योगिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा आणि शिक्षणाचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे. येथे सर्व उद्योगांची चांगली भरभराट झाल्यामुळे व तसेच मी स्वतः पुणे येथे राहत असल्यामुळे मला खूप काही चांगले असे भविष्य पुढे दिसत होते. माझ्या भावालासुद्धा केमिकल क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव व तसेच माझा मुलगा केमिकल इंजिनियर असल्याने आणि त्यालाही कामाचा योग्य असा अनुभव असल्यामुळे आपण केमिकल क्षेत्रामध्ये काही तरी उत्पादन व्यवसाय चालू करू शकतो, असा निर्णय पक्का झाला.

पूर्वी मी कॉलेज शिकत असताना JINGO BOND या अडेसिव्ह कंपनीचे प्रोडक्ट्स विक्रीचे मी स्वतः काम करीत होतो. मग ठरले की आपण अडेसिव्हमध्ये काम करायचे. आमचा पूर्ण परिवार व मित्रपरिवार १९९८-१९९९ पासून तयारीला लागला. आम्ही सर्वांनी सखोल अभ्यास केल्यानंतर ईपॉक्सी रेसिन, हार्डनर आणि पॉलीयुरेथेन मटेरीअलचे उत्पादन करायचे ठरले.

मला निवृत्त व्हायला ७ वर्ष बाकी होते. निवृत्त झाल्यानंतर व्यवसाय स्थापन करून चालवणे म्हणजे खूप उशीर होईल, असे मला वाटले व काही योग्य अनुभवी व्यक्तींनीसुद्धा मला तेच सांगितले की आता व्यवसाय चालू करणे हे तुम्हाला फायदयाचे राहील. कारण भविष्यात ७ वर्षापर्यंत सर्वच क्षेत्रात महागाई वाढलेली असेल. माझे वय वाढलेले असेल, शरीरातील कार्यक्षमता, शक्ती कमी झालेली असेल व तसेच जागा, बांधकाम मटेरीअल, स्टील, विटा, सिमेंट, मशिनरी, कच्चा माल, लेबर रेट यांचे भाव पण अतोनात वाढलेले असतील.

पुढे व्यवसाय चालू केल्यानंतर तो मार्केटमध्ये सेट होण्यासाठी पुढे आणखी ५ वर्ष लागणार हे जाणून होतो. त्यामुळे “कल करे सो आज कर और आज करे सो अभी कर”, असे मार्गदर्शन बऱ्याच अनुभवी व्यावसायिक मित्रपरिवार यांनी केले. त्यानंतर लगेचच योग्य तो कौटुंबिक निर्णय घेऊन मी कंपनी सोडली आणि वयाच्या बरोबर ५१व्या वर्षी आयुष्याच्या एका नवीन व धाडसी उत्तर महापर्वाला सुरुवात झाली.

पुढे भविष्य निर्वाह निधी आणि बँक लोन यातून आलेल्या पैशातून व्यवसायासाठी लागणारी आवश्यक ते सर्व परवाने, मशिनरीज, कच्चा माल खरेदी केला आणि राहिला प्रश्न तो फक्त जागेचा, तोसुद्धा सुटला माझ्या वडिलांनी अगोदरच खेडशिवापूर येथे जागा घेतलेली होती, त्या जागेवर बांधकाम करून आणि आवश्यक ते सर्व रीतसर परवाने, मशिनरीज, कच्चा माल खरेदी करून शेवटी कंपनी कायेशीर रजिस्टर करून यशस्वीपणे चालू केली.

आज कंपनीला, एम.एस.एम.ई., आय.एस.ओ. ९००१: २०१५, आय.एस.ओ. १४००१: २०१५, आर.ओ.एच.एस. सर्टिफिकेशन प्राप्त झालेले आहे. आज कंपनीची वार्षिक उलाढाल २ कोटीच्या घरात आहे आणि पुढील ५ वर्षात जास्तीत जास्त १० पटीने वाढवण्याचे व तसेच कंपनी प्रायवेट लिमिटेड करण्याचे नियोजन आतापासूनच चालू केलेले आहे.

या ब्रँड अंतर्गत कोणकोणती प्रॉडक्ट्स किंवा सेवा येतात?

  1. इपोमॅक्स – ईपॉक्सी आर्ट आणि क्राफ्ट रेसिन
  2. इपोमॅक्स – टेबलटोप व वूड वर्क ईपॉक्सी रेसिन
  3. इपोमॅक्स – ईपॉक्सी पोटिंग कम्पौंड – फ्लेक्सिबल आणि हार्ड
  4. इपोमॅक्स – पॉलीयुरेथेन पोटिंग कम्पौंड – फ्लेक्सिबल आणि हार्ड
  5. इपोमॅक्स – ईपॉक्सी बॅटरी अडेसिव्ह
  6. इपोमॅक्स – ईपॉक्सी क्रॅक फिलर अडेसिव्ह
  7. इपोमॅक्स – ईपॉक्सी फ्लोअर कोटिंग
  8. इपोमॅक्स – ईपॉक्सी पुट्टी
  9. इपोमॅक्स – ईपॉक्सी प्रायमर
  10. इपोमॅक्स – ईपॉक्सी जेलकोट
  11. इपोमॅक्स – ईपॉक्सी स्टोन अडेसिव्ह
  12. इपोमॅक्स – वाटर प्रूफिंग अडेसिव्ह
  13. इपोमॅक्स – टाईल जॉईन अडेसिव्ह
  14. इपोमॅक्स – फ्लोअर क्रॅक अडेसिव्ह
  15. इपोमॅक्स – टेरेस क्रॅक अडेसिव्ह
  16. इपोमॅक्स – लॅमिनेशन रेसिन
  17. इपोमॅक्स – डोम स्टिकर रेसिन
  18. इपोमॅक्स – गोल्डन ईपॉक्सी पुट्टी फॉर इमिटेशन ज्वेलेरी

कंपनीचे नाव : जयप्रभा पॉलिमर टेक्नॉलॉजिज

कंपनीचे मालक : संजय प्रभाकर सोनवणे व ऋषिकेश संजय सोनवणे

sanjay prabhakar sonawane
संजय सोनवणे

संजय प्रभाकर सोनवणे – मूळ राहणार, पुणे, वय ५५, शिक्षण BCOM, MCM, MBA, पोस्ट डिग्री आय बी एम आर, मुक्तांगण, पुणे येथे झाले.

अनुभव : अकाउंट व फायनान्स, प्रशासन, व्यवस्थापन, मानव संसाधन, परचेस, उत्पादन प्रोसेस, प्रॉडक्ट् कॉस्टिंग, सेल्स व्यवस्थापन, प्रॉडक्शन प्लानिंग, कंपनी फोर्मेशन ते कंपनी डिझोलूशन पर्यंत इत्यादी विषयांचा २७ वर्षांचा दांडगा अनुभव.

ऋषिकेश संजय सोनवणे – शिक्षण Diploma In Paint Technology, B,Tech–Chemical, MIT Pune. केमिकल इंजिनियर असल्याने आणि त्यालाही कामाचा योग्य असा अनुभव असल्यामुळे तो केमिकल क्षेत्रामध्ये काही तरी उत्पादन व्यवसाय चालू करू शकतो, असा ठाम विश्वास होता व त्याच्या भविष्यासाठी त्याच्या पाठीशी ठाम उभे राहणे हे मला योग्य वाटत होते.

संपर्क : 98609 994740 | 83291 99910 | 82080 87893

पत्ता : जयप्रभा पॉलिमर टेक्नॉलॉजिज, जयवंत इस्टेट, गट ७२९, प्लॉट न. ३६/३, पुणे-सातारा हायवे रोड, पोस्ट वेलू, तालुका भोर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र, पिनकोड ४१२२०५.

वेबसाइट : www.jaiprabhapolymertec.in

ई-मेल : jaiprabhapolymertec@gmail.com

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Scroll to Top