“आधी काम, नंतर पैसे” हे तत्त्व वापरून महाराष्ट्रभर विस्तारला BreakComfort®️ हा ब्रँड

ब्रँडचे नाव – Breakcomfort®️ Business Registration Services

Tagline – Change Your Comfort Path®️

ब्रॅण्ड स्थापना – १ February २०२०

आपण कोणतेही काम करत असताना ठराविक काळानंतर एका कोषात जातो आणि तेच जग आहे आपल अजून काही करायला नको म्हणजे आपण समाधानी असतो. या अवस्थेला Comfort Zone म्हणतात. आमचा ब्रॅण्ड त्याच्या नावातून हेच दर्शवतो आपला हा Comfort Break करा आणि आपल्यामध्ये असलेली अफाट गुणवत्ता वापरून आपल्या आयुष्याला वेगळे वळण देऊन यशाकडे मार्गक्रमण करा. ब्रॅण्डची पण tagline हेच दर्शवते Change Your Comfort Path ®️ तुमचा आरामाचा मार्ग बदला.

आपण कोणतेही काम करत असताना ठराविक काळानंतर एका कोषात जातो आणि तेच जग आहे आपल अजून काही करायला नको म्हणजे आपण समाधानी असतो. या अवस्थेला Comfort Zone म्हणतात. आमचा ब्रॅण्ड त्याच्या नावातून हेच दर्शवतो आपला हा Comfort Break करा आणि आपल्यामध्ये असलेली अफाट गुणवत्ता वापरून आपल्या आयुष्याला वेगळे वळण देऊन यशाकडे मार्गक्रमण करा. ब्रॅण्डची पण tagline हेच दर्शवते Change Your Comfort Path®️ तुमचा आरामाचा मार्ग बदला.

मी सागर शेडगे. सातारा जिल्ह्यातील कास पठार भागातील आंबाणी हे आमचे छोटेसे २०० ते २५० लोकवस्तीचे गाव. अत्यंत दुर्गम डोंगर भागातील आमच्या परिसरातील लोकांना ठोस असं उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे आणि शेती मर्यादित पारंपारिक पद्धतीने काही ठराविक पिके गरजेपुरती घेणे आणि बाकी छोटी मोठी कामे करून साताऱ्यातून गरजेच्या वस्तू विकत घेणे हा पर्याय.

त्याकाळी शिक्षणही जास्त नसल्यामुळे लोकांचा ओढा मुंबईकडे. १९७० च्या दशकात लोकांचे स्थलांतर झाले. त्यात आमचंही कुटुंब होतं. वडील सातवीला असताना दिवसा काम रात्री शाळा असं करत दहावीपर्यंत शिकले. १९९६ ला त्यांनी मुंबईच्या कांदिवली उपनगरात चाळीमध्ये खोली घेतली. त्यांचा लहानपणापासुन संघर्ष पाहत होतो.

नेहमी वाटत होत ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे, स्वप्नं नेहमी मोठी पाहायचो. असंच शिक्षण चालू असताना गाडी धुण्यापासून अकरावीला असताना कामाला सुरुवात केली आणि एके दिवशी गेटवे ऑफ इंडियाला मित्रासोबत भेट दिली आणि नजरेस पडले समुद्र किनारी असलेले भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल ताज. मित्राला बोललो, एक दिवशी नक्की येईन येथे बिझिनेसमेन बनून आणि नाही परवडलं तर चहा तर नक्की घेईन.

ते वर्ष होतं २००८. वर्ष जात होती, माझं बीकॉमपर्यंत शिक्षण पूर्ण होऊन वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या चालू होत्या. २०१७ ला अशीच एक सीए फर्म जॉइन केली, पण आतापर्यंत खूप कामे केली, पण आपला व्यवसाय असावा असं नेहमी वाटायचं. लोकांनी आपल्याला सर बोलावं, खूप चांगल्या प्रकारे लोकांची काम करावी अस मनोमन वाटत होत.

त्या फर्ममध्ये खूप मनापासून आपलं समजून काम करत होतो. मग एके दिवशी ठरवलं आपला व्यवसाय सुरू करायचा. या पुढे कधीच नोकरीच्या मार्गाला जायच नाही. जानेवारी २०२० ला तसं माझ्या वरिष्ठांना सांगितलं आणि नोकरी सोडली.

१ फेब्रुवारी २०२० ला BreakComfort®️ Business Registration Services ची मुंबईमध्ये सुरुवात केली. व्यवसायाच्या ऑनलाईन मार्केटिंगला सुरुवात केली. साहजिकपणे त्यांना मी व्यवसाय सुरू केला ही बाब त्यांना समजणार होती, त्यांना राग येण्याचे कारण नव्हते कारण मी नव्याने माझ्या व्यवसायाची सुरवात करणार होतो, त्यांना फसवल नव्हते किंवा त्यांच्या कोणत्या Clients ना काम द्या मी अत्यंत माफक दरात सर्व्हिस देतो ना अशी कधी विचारणा केली होती ना करणार होतो.

मला त्यांचा कॉल आला त्यातील एक व्यक्ती बोलली तू आम्हाला न सांगता व्यवसाय सुरू केलास अस करायला नको होत आणि दुसरी व्यक्ती त्या फर्ममधील एक स्त्री अत्यंत वाईट शब्दात माझ्याशी बोलत होती. मी ऐकत होतो. माझी काही चुक नसताना नंतर ती एक शब्द बोलली, तू ना कर व्यवसाय, तुला फक्त गुमास्ता (शॉप ॲक्ट) येतो तेच कर. मला हे शब्द लागले तेव्हाच ठरवल या शब्दांचा प्रेरणेसारखा वापर करायचा आणि स्वतःला सिद्ध करायच.

दीड महिना असाच कामासाठी संघर्ष चालू होता आणि २१ मार्च २०२० ला लॉकडाऊन लागला सर्वच व्यवसाय ठप्प पडले. काही बंद झाले, कितीतरी लोकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यामुळे पुढील काही महिने काहीच काम नाही. परत परिस्थिती पूर्वपदावर येत होती आणि केली सुरवात सप्टेंबर २०२० ला पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या फेसबुक बिझिनेस ग्रूप मधून जाहिरात करून कामे मिळवत गेलो आणि ही कामे स्वतः करू लागलो.

“अगोदर काम नंतर पैसे” ही आगळीवेगळी Strategy वापरून पूर्ण महाराष्ट्रभर काम करू लागलो. माफक योग्य प्रोफेशनल फी, चांगली जलद सर्व्हिस आणि काही कामांसाठी, “अगोदर काम नंतर पैसे” ही आगळीवेगळी Strategy वापरून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात काम केली. हेच नाही उत्तर प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यातील लोकांची काही कामे केली. आज सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की १४००+ वेगवेगळ्या व्यवसाय व इतर नोंदणी आपण केल्या आहेत.

शेवटी ठरवल १ फेब्रुवारी २०२३ ला BreakComfort®️ Business Registration Services चा ३ रा स्थापना दिवस (३rd Founding day) हॉटेल ताज महाल, मुंबई येथे समुद्र किनारा दिसेल अशा तेथील रेस्टॉरंट मध्ये ठिकाणी साजरा करायचा आणि तो Sea Lounge Restaurant , Taj Mahal Tower ( Hotel), Apollo Bandar, Colaba, Mumbai येथे केला आणि खूप वर्षांच स्वप्नं साकार झाल.

कंपनीचे मालक – सागर शेडगे (Founder and CEO BreakComfort®️ Business Registration Services)

अनुभव व कामगिरी – ६ वर्षांपेक्षा अधिक काळ व्यावसायिक नोंदणी क्षेत्रात काम केल्याचा अनुभव. मागील अडीच वर्षात 1400+ विविध व्यावसायिक नोंदणी केल्या आहेत.

वेगळेपण : शॉप ॲक्ट गुमास्ता, उद्यम आधार, जी एस टी, इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड, फूड लायसेन्स बेसिक नोंदणी , प्रोफेशनल टॅक्स सर्टिफिकेट ही कामे आधी काम नंतर पैसे या तत्त्वावर करतो.

Services: Business Registration Services Shop and Establishment Gumasta Registration, Import Export Code License, GST Registration, FSSAI Food Registration, Trademark ™️ ®️ Registration, Professional tax Registration, MSME Udyam Registration etc.

संपर्क क्रमांक – 9867008910

Facebook Page – https://www.facebook.com/BreakComfort

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
Scroll to Top